शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

शेजाऱ्याने कोरलेला बांध सॅटेलाइट टिपणार; आता प्रत्येक कर्मचाऱ्याकडे रोव्हर्स असणार

By दिनेश पठाडे | Published: January 13, 2024 6:00 PM

जमिनीची मोजणी अचूक व जलद गतीने होण्यासाठी उपग्रहीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाच्या भारत सर्व्हेक्षण संस्था या विभागाने महाराष्ट्र राज्यात ७७ निरंतर उपग्रहीय स्थान वाचन करणारी केंद्रे स्थापन केली आहेत.

वाशिम : जिल्हा भूमी अभिलेख विभाग हायटेक झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून आणखी १२ रोव्हर्स आणि ३६ लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे जमीन मोजणीशी निगडीत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे हे उपकरण उपलब्ध झाले आहे. परिणामी यापुढे शंभर टक्के मोजणी रोव्हर्सने केली जाणार आहे. प्रत्येक भूमापकास आणि कर्मचाऱ्यास रोव्हर्स व लॅपटॉप उपलब्ध झालेला वाशिम हा राज्यात पहिला जिल्हा ठरला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले यांनी दिली.

जमिनीची मोजणी अचूक व जलद गतीने होण्यासाठी उपग्रहीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाच्या भारत सर्व्हेक्षण संस्था या विभागाने महाराष्ट्र राज्यात ७७ निरंतर उपग्रहीय स्थान वाचन करणारी केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्राकडून अक्षांश, रेखांश व समुद्र सपाटीपासून उंची याचे अचूक निरीक्षण नोंदवून त्याचा उपयोग भूमापनासाठी करण्याचे शास्त्र विकसित केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले रोव्हर्स गतवर्षात उपलब्ध झाले होते. रोव्हर्सवर शंभर टक्के कामकाज आणि मागील वर्षभरापासून राज्याच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयाने विकसित केलेली जमीन मोजणीची ऑनलाइन ई-मोजणी २.० या जीआयएस पोर्टलवर काम करण्याचा मान राज्यात सर्वप्रथम वाशिम जिल्ह्याला मिळाला होता. या प्रणालीमुळे जमीन मोजणीशी संबंधित सर्व कामे गतीने होत आहेत. आधुनिकीकरणासाठी आवश्यक साधनसामग्री शासनाने उपलब्ध केल्याने भूमीधारकांना गतिमान, अचूक व पारदर्शक सेवा मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. रोव्हर्सने मोजणी करून घेतली तर समोरच्याने किती बांध कोरला हे स्पष्ट होईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल.३१ रोव्हर्स, ६६ लॅपटॉप असणारा पहिला जिल्हा

वर्षभरापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जिल्हा खान प्रतिष्ठानमधून १ कोटी २० लाख रुपयांचा निधी भूमी अभिलेख विभागासाठी मंजूर करुन १२ रोव्हर्स खरेदी केले होते. राज्याच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांनी ७ रोव्हर्स वाशिम जिल्ह्यासाठी दिले होते. एकूण १९ रोव्हर्स व ३० लॅपटॉपचा उपयोग करून जिल्ह्यात १०० टक्के जमीन मोजणी कामकाज रोव्हर्सवर करणारा राज्यातील पहिला जिल्हा वाशिम ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा १२ रोव्हर्स आणि ३६ लॅपटॉप उपलब्ध झाल्यामुळे जमीन मोजणी संबंधित असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे रोव्हर्स आणि लॅपटॉप असणारा वाशिम हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.यापूर्वी उपलब्ध असलेले एकूण १९ रोव्हर्स व ३० लॅपटॉप कमी पडत असल्याने पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ९७ लाख  रुपयाचा निधी मंजूर केला होता. सदर निधीमधून १२ रोव्हर्स व ३६ लॅपटॉप खरेदी करुन त्याचे वाटप संबंधित कर्मचाऱ्यांना केले आहे - शिवाजीराव भोसले, जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख वाशिम