शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उभ्या ट्रकला धडक, ‘हायड्रोजन’चा ट्रक पेटला; चालक-क्लीनर गंभीर

By दिनेश पठाडे | Published: March 11, 2024 4:42 PM

कारंजा तालुक्यातील लोकेशन १७६ वरील घटना

वाशिम : हायड्रोजन मोनॉक्साईड हे केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकने मार्गावरील उभ्या ट्रकला धडक दिल्याने ट्रकने पेट घेऊन ट्रक जळून खाक झाल्याची घटना ११ मार्चला सकाळी घडली. यामध्ये चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले. ही  घटना समृद्धी महामार्गावरील लोकेशन १७५ म्हणजेच कारंजा तालुक्यातील दोनद या गावाजवळ घडली. बक्षीरसिंग (वय २५) व सरजीत बशीर (वय २५)अशी जखमींची नावे असून ते दोघेही पंजाबमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार पी.बी.४६ डब्लू १७३८ क्रमांकाचा ट्रक छत्रपती संभाजीनगरहून नागपूर येथे हायड्रोजन केमिकल घेऊन जात असताना दोनद गावानजीक  उभ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे दोन वाहनांमध्ये घर्षण होऊन हायड्रोजन घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला. या घटनेत चालक व क्लीनर जखमी झाले. जखमींना समृद्धी महामार्ग १०८ चे डॉ. भास्कर राठोड व आतिश चव्हाण यांनी प्राथमिक उपचारांसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

परंतु तपासणी दरम्यान त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने  अकोला येथे पाठविण्यात आले. दुसऱ्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती कारंजा न.प.च्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियत्रंण मिळवले. त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. या घटनेत जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले.

टॅग्स :Accidentअपघातwashimवाशिम