वाशिम: राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे वाशिम जिल्हा सीमेवर आगमन होतात अमरावती येथील रामराज्य ढोल ताशा ध्वज पथकाच्या सदस्यांनी चाळीस ढोलांच्या निनादाने वातावरणात उत्साह निर्माण केला.
कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडोपती यात्रा मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी विदर्भात दाखल झाली. सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे वाशिम जिल्ह्याचे सीमेवर या पदयात्रेचे हजारो कार्यकर्ते विविध कलासंच, तसेच जनतेकडून जंगी स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या स्वागतासाठी अमरावती येथील सदस्यांचे रामराज्य ढोल ताशा ध्वज पथकही दाखल झाले होते.
राहुल गांधी हे वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर तयार करण्यात आलेल्या लाल किल्ल्याच्या प्रतिकृती प्रवेशद्वारा जवळ दाखल होतात रामराज्य ढोल ताशा ध्वज पथकातील सदस्यांनी ४० ढोल वाजवत वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. जवळपास दोन मिनिटे हा कार्यक्रम चालला. या पथकात युवकांसह युवतींचाही समावेश होता. या पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.