शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत ‘आपसमेळ योजना’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 6:58 PM

वाशिम : मागील आर्थिक वर्षातील आर्थिक उलाढाल ७५ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या किरकोळ व्यापारी, सेवा पुरवठादार उत्पादक किंवा उपहारगृह चालकांसाठी वस्तू व सेवा कायद्यांतर्गत आपसमेळ योजना (कॉम्पोझिशन स्कीम) अंमलात आणली आहे. या योजनेत इच्छूकांना ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत सहभागी होता येईल, असे वस्तू व सेवा कर कार्यालयामार्फत कळविण्यात आले. आपसमेळ योजनेमध्ये कराचा दर किरकोळ व्यापारी, सेवापुरवठादार यांच्यासाठी १ टक्के, उत्पादकांसाठी २ टक्के व उपहारगृह चालकांसाठी ५ टक्के राहणार आहे.

ठळक मुद्दे३० सप्टेंबरपर्यत सहभागी होता येणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मागील आर्थिक वर्षातील आर्थिक उलाढाल ७५ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या किरकोळ व्यापारी, सेवा पुरवठादार उत्पादक किंवा उपहारगृह चालकांसाठी वस्तू व सेवा कायद्यांतर्गत आपसमेळ योजना (कॉम्पोझिशन स्कीम) अंमलात आणली आहे. या योजनेत इच्छूकांना ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत सहभागी होता येईल, असे वस्तू व सेवा कर कार्यालयामार्फत कळविण्यात आले. आपसमेळ योजनेमध्ये कराचा दर किरकोळ व्यापारी, सेवापुरवठादार यांच्यासाठी १ टक्के, उत्पादकांसाठी २ टक्के व उपहारगृह चालकांसाठी ५ टक्के राहणार आहे.सेवा क्षेत्रामधील उद्योगांपैकी केवळ उपहारगृह चालकांसाठी ही आपसमेळ योजना उपलब्ध आहे. तंबाखू उत्पादक तसेच उत्पादित तंबाखूचा पर्याय ठरू पाहणारी इतर तत्सम उत्पादने, पानमसाला, कोकोयुक्त किंवा कोको नसणारी आईसक्रिम किंवा इतर बर्फ खाद्य पदार्थांच्या उत्पादकांना आपसमेळ योजनेचा लाभ घेता येणार नाही. आपसमेळ योजनेचा लाभ घेतलेल्या करदात्यांना, प्रत्येक तिमाहीसाठी, एकूण उलाढालीची माहिती अंतर्भूत असणारे एकच तिमाही विवरणपत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार आहे. विक्री बिलांचे विस्तृत तपशील देण्याची गरज असणार नाही. योजनेचा लाभ घेतलेल्या लहान करदात्यांना विवरणपत्रामध्ये एचएसएन कोड नमूद करण्याची आवश्यकता नाही. मात्र योजनेचा लाभ घेतलेल्या करदात्यांना आदान कर लाभ (इनपुट टॅक्स क्रेडीट) घेता येणार नाही. तसेच आपल्या खरेदीदारांसाठी असा लाभ पुढे सुद्धा पाठवता येणार नाही. नोंदणी, विवरणपत्रके, रोख करभरणा, परतावा आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी संपूर्णपणे संगणकीकृत, आॅनलाईन व्यवस्था आहे. इच्छूकांनी या योजनेत ३० सप्टेंबरपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन वस्तू व सेवा कर कार्यालयातर्फे करण्यात आले.