वाशिम : कामाचा मोबदला नियमित मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी वारला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत धडक देताच, १० फेब्रुवारी रोजी तीन महिन्यांचे थकीत मानधन संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.वारला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असताना, आरोग्यविषयक सर्व कर्तव्य पार पाडले जात आहे. कुष्ठरूग्ण, क्षयरुग्ण शोध मोहिम असो की माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिम असो या सर्व मोहिमेत आशा, गटप्रवर्तकांनी कर्तव्य बजावले आहे. कामाचा मोबदला नियमित मिळत नाही, तीन महिन्यांपासून मोबदला बँक खात्यात जमा करण्यात आला नाही यासह विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या कक्षात धडक देत आपल्या व्यथा मांडल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्याशीदेखील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी चर्चा केली. याची दखल घेत मोहिते व डॉ. आहेर यांनी संंबंधितांना सूचना देत तीन महिन्यांचे थकीत मानधन संबंधितांना देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी ५७ आशा स्वयंसेविका, दोन गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यात थकीत मानधनाची रक्कम जमा करण्यात आली.
आशा, गटप्रवर्तकांना थकीत मानधन मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 5:20 PM