कोरोना महामारी मुळे शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे पालक विद्यार्थी शिक्षक चिंतित होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये असे सर्वांना वाटत होते. आॅनलाइन क्लासेस सुरू झाले. त्यात अनेक अडचणी होत्या. या सर्व अडचणींवर मात करत अबॅकस चॅम्पस् अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले शिक्षिका डॉक्टर राजकुमारी संजय परदेशी यांनी उत्तम समन्वय नियोजनबद्ध अभ्यासक्रम घेत या यशात मोलाची भूमिका वठविली. संचालिका आणि शिक्षिका डॉ. राजकुमारी संजय परदेशी म्हणाल्या की, अशा प्रकारचे क्लासेस ही काळाची गरज आहे अशा प्रकारचे शिक्षण हे मुलांच्या शारीरिक-मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी व मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक आहे या स्पर्धांत अॅक्युरसी स्पर्धेत राजवीर जीरवणकर, स्वरा डव्हळे, अनुष्का बेलोकार, अर्चिता बबेरवाल, अपूर्वा मानधने, भव्य हरावत, हर्षल बगडीया, प्रतिक कदम, तनुश्री बगडीया, वेदिका मानधने, इशिका काळे, देवयानी जीरवणकर, अर्णव जीरवणकर, श्रावणी साखरे, श्रेया नरवाडे, शौर्य जीरवणकर, वंश तोतला, अनुश्री पंचवाटकर, अर्णव सोनुने, सोहम बुट्टे, राधा बरवे, श्रेया देशमुख, अमेय जाधव, आर्यन देशमुख, बलराज देशमुख, रुद्र लोखंडे, श्लोक गायकवाड, सिद्धेश मानधने यांनी प्रथम, तर यश तोतला, अब्दुल मुसद्दीक शेख, अर्णव अवताडे, अर्श सराफ, चेल्सी हरावत यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पीड स्पर्धेत स्वरा डव्हळे, राजवीर जीरवणकर, यश तोतला, अपूर्वा मानधने, शौर्य जीरवणकर यांनी द्वितीय, तर अर्चिता बबेरवाल, अब्दुल मुसद्दीक शेख, चेल्सी हरावत, श्रावणी साखरे, श्रेया नरवाडे, श्रेया देशमुख, वेदिका मानधने, यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
अबॅकस चॅम्पस् अकॅडमी, रिसोडचे अबॅकस स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:41 AM