लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोडच्या मुख्याधिकार्यांना (सीओ) शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रिसोड पोलीस आरोपीच्या घराभोवती पहारा देऊन असल्याचे दिसून येते.रिसोड नगर परिषदेतील लेखा परीक्षक पदावरुन निलंबित केलेले कर्मचारी संतोष चोपडे यांनी मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना शासकीय निवासस्थानी जावुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती, तसेच पानझाडे यांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएसद्वारे वारंवार शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुख्याधिकार्यांनी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने चोपडे याच्याविरूद्ध अनु.जाती-जमाती अत्याचार प्र ितबंधक कायद्यातील तरतूद ३ (१) (१0) २९४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चोपडे यांची नगर परिषदेचे लेखा परीक्षकबाबतची कामगिरी असमाधानकारक असल्याने आयुक्तांनी मुख्याधिकार्यांची वेतनवाढसुद्धा रोखली होती. चोपडे हे कार्यालयीन कामे करीत नसल्याने त्यांच्यावर १७ जुलै २0१७ रोजी जिल्हाधिकार्यांनी निलंबनाची कार्यवाही केली होती. या निलंबनाकरिता मु ख्याधिकार्यांना दोषी ठरवत आकसबुद्धीने चोपडे हे जा तीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होते, असे पानझाडे यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीहून रिसोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. यामुळे नगर परिषद वतरुळात एकच खळबळ उडाली असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी रिसोड पोलिसांचे पथक आरोपीच्या घराभोवती पहारा देऊन आहे त, तसेच अन्य ठिकाणीदेखील आरोपीचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.
फरार आरोपीचा शोध सुरूरिसोड नगर परिषदेतील लेखा परीक्षक संतोष चोपडे यांनी मु ख्याधिकार्यांना शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी व २ ऑगस्ट रोजी रिसोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपीच्या शोधासाठी गेले असता, आरोपी फरार असल्याची माहिती रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली.
सदर कर्मचार्याने आकसबुद्धी ठेवून कृत्य केले आहे. ए खादा कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करणार असेल तर त्याला समज देणे व कर्तव्य करण्याचे सांगणे माझे कार्य आहे. काम न केल्याने त्यांचे पेमेंट थांबविले असताना ते उ पोषणाला बसले होते, तेव्हा मीच त्यांचा तीन महिन्यांचा पगार काढून देऊन त्यांचे उपोषण सोडविले होते, तरी त्यांचे माझ्यासोबतचे गैरकृत्य सुरुच होते. पर्यायी मला पोलिसांत तक्रार देण्याची वेळ आली.- सुधाकर पानझडेनगर परिषद मुख्याधिकारी, रिसोड.