सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक पातळीवर कृषीविषयक योजनांची कामे सुसह्य व्हावी, शेतकर्यांची माहिती एकत्रित करणे सोपे व्हावे आणि कृषी सहायकांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, या उद्देशाने वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी ‘अभिनव संकलन’ या नावाचे ‘मोबाइल अँप’ तयार केले असून, त्याचा प्रभावीरीत्या वा परही केला जात आहे. देवगिरीकर यांनी ‘अभिनव संकलन’ या ‘अँप’बाबत अधिक माहिती देताना सांगितले, की शासन स्तरावरून जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आणि पीक कापणी प्रयोग असे तीन प्रकारचे मोबाइल अँप वापरले जातात. त्याचा अपेक्षित फायदादेखील होत आहे. मात्र, योजनांतर्गत लाभार्थींच्या अर्जांची माहिती गोळा करण्याबाबत अशी कुठलीच सोय नव्हती. त्यामुळे सर्वार्थाने कठीण असलेले हे काम करीत असताना कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षकांसोबतच तालुका कृषी अधिकार्यांनाही अ तोनात त्रास होत असे, ही बाब लक्षात घेऊन सखोल अभ्यासांती ‘गुगल’वरील ‘अँप शीट’च्या माध्यमातून आपण ‘अभिनव संकलन अँप’ची निर्मिती केली. वाशिम तालुक्या तील सर्व कृषी सहायकांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन ‘अँ प’च्या वापरासाठी प्रोत्साहित करण्यात आल्याचे देवगिरीकर यांनी सांगितले.
असे उपयोगात येते ‘अँप’या अँपमध्ये लाभार्थीचे नाव, गाव, मोबाइल नंबर, प्रवर्ग, क्षेत्र वर्गीकरण आदी माहितीसोबतच संबंधित शेतकर्याला कॉल करणे, एसएमएस करणे आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ‘एक्सेल शीट’मधून हा ‘अँप’ कार्य करीत असल्याने केवळ लाभार्थीचे नाव भरल्यास इतर माहि ती पर्यायांच्या माध्यमातून भरणे सोपे असल्याने सर्व कृषी सहायकांनी ते विनाविलंब आत्मसातदेखील केले. ‘अभिनव संकलन’च्या माध्यमातून २८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २0१७ या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर सिंचन साधने या बाबीखाली अर्ज भरून घेण्यात आले असून, त्यास अप्रतिम प्रतिसाद लाभत तब्बल ४0४९ अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती देवगिरीकर यांनी दिली.
कृषी सहायकही झाले ‘हायटेक’!सदोदित शेतकर्यांच्या अवतीभोवती आणि विशेषत: ग्रामीण भागात वावरणार्या बहुतांश कृषी सहायकांजवळ अँन्ड्रॉइड मोबाइल आहेत; पण त्याची उपयुक्तता केवळ फोन लावणे आणि आलेला फोन उचलणे एवढीच होती. ‘अभिनव संकलन’ या अँपमुळे मात्र वाशिम तालुक्यातील सर्वच कृषी सहायक ‘हायटेक’ झाले असून, ‘ऑनलाइन’ प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ पाहत असल्याचे तालुका कृषी अधिकारी देवगिरीकर यांनी सांगितले.