लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : स्थानिक स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फुर्त हजेरी लावली.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू. के. पोकळे होते. मार्गदर्शक म्हणून मूर्तिकार राजेश खंदारकर, मूर्तिकार यादव इंगळे उपस्थित होते. यावेळी रासेयो क्षेत्रीय समन्वयक सतीश चंद्रशेखर, शिवमंगल गौर, श्रीकृष्णराय कोकीळवार, डॉ.अश्विन काटेकर, प्रकाश बोबडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळा आयोजन समितीेचे समन्वयक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सिमित रोकडे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनाचा उद्देश विषद केला. डॉ. अश्विन काटेकर यांनी निसर्ग जगला तरच आपण जगू असे सांगून विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनासाठी या कार्यशाळेचे महत्व पटवून दिले. मुर्तीकार राजेश खंदारकर यांनी इतर प्रकारची माती व शाडूची माती यामधील फरक सांगितला व मातीच्या गणपतीचे निसर्ग संवर्धनासाठी महत्व विषद केले. मुर्तीकार यादव इंगळे यांनी शाडूच्या मातीपासून गणपती कसे बनवतात हे सांगितले. प्राचार्य डॉ. डब्ल्यु.के. पोकळे यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्व सांगितले.राजेश खंदारकर, यादव इंगळे यांनी गणपतीची मुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सुद्धा हेच प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यशाळेमध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मातीपासून गणपतीच्या मुर्ती बनविल्या. कार्यशाळेच्या अंतिम टप्यात सर्वांनी निसर्ग संवर्धनात जास्तीत जास्त हातभार लावण्याची शपथ घेतली संचालन सहायक प्राध्यापक वरुणकुमार लोहीाय यांनी तर आभार सहायक प्राध्यापक डॉ.स्मिता लांडे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ.सिमित रोकडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी वरूणकुमार लोहीया, प्रा. श्रीकांत कलाने, डॉ.स्मिता लांडे, डॉ.योगेश साखरे, डॉ.जया सोमटकर यांनी परिश्रम घेतले.
२०० विद्यार्थ्यांनी घेतले शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:44 PM
शिरपूर जैन (वाशिम) : स्थानिक स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फुर्त हजेरी लावली.
ठळक मुद्देमुर्तीकार यादव इंगळे यांनी शाडूच्या मातीपासून गणपती कसे बनवतात हे सांगितले.प्राचार्य डॉ. डब्ल्यु.के. पोकळे यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्व सांगितले.