- नंदकिशोर नारेवाशिम : पाणी फाउंडेशनकडुन राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत मंगरूळपीर व कारंजा तालुक्यातील रात्र अन दिवस एक करुन लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या जलरत्नांच्या सत्कारासाठी प्रमुख मान्यवरांची अनुपस्थिती दिसून आली. जलरत्नांचा उत्साह वाढविण्यासाठी व त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी प्रमुख मान्यवरांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी ८ एप्रील ते २२ मे दरम्यान मंगरुळपीर व कारंजा तालुक्यातील गावकऱ्यांनी लोकसहभाग व शासनाच्या सहकायार्ने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली . यात नागरिकांनी हिरारीने भाग घेतला. अनेक संघटना, संस्थांनी स्वताहून पुढाकार घेवून या उपक्रमात उडी घेतली. भविष्यात जाणविणारी पाणी समस्या लक्षात घेता यामध्ये कोणताही उद्देश न ठेवता नागरिकांनी हिरारीने भाग घेवून लोकसहभागातून कामे केलीत. याची प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना सुध्दा कल्पना आहे. उत्क्ृष्ट कामे करणाऱ्या व यामध्ये हिरारिने भाग घेणाऱ्या जलरत्नांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करुन जलरत्नांचा गौरव कार्यक्रम ठेवून त्यांच्याप्रति प्रशासन जागृत आहे हे दाखवून दिले, परंतु जिल्हयातील प्रमुख मान्यवरांनी अनुपस्थिती दर्शवून सर्व कार्यक्रमावर पाणी फेरले असल्याची चर्चा आता होताना दिसून येत आहे. जलरत्नांचा सत्कार पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते व आ राजेंद्र पाटणी ,आ लखन मलिक,आ अमित झनक,जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील,जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने, उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक,डॉ शरद जावळे ,तहसीलदार वैशाख वाहुरवाघ,तहसीलदार सचिन पाटील, पाणी फाउंडेशन विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे, व जिल्हासमन्वयक संतोष गवळे,याच्या प्रमुख उपस्थीतीत आयोजित होता. परंतु या कार्यक्रमाला ज्यांच्याहस्ते सत्कार होणार होता ते जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हयाचे प्रमुख जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, ज्या मतदार संघातील जलरत्नांचा सत्कार होणार होता त्या मतदार संघाचे आमदार लखन मलिक कार्यक्रमास हजर दिसून आले नाही. असे असले तरी कारंजा व मंगरुळपीर तालुक्यातील समन्वयक यांनी कार्यक्रम यशस्वी केला; परंतु त्यांच्याही मनात याबाबत खंत दिसून येत आहे. कामाच्या व्यस्ततेतही आमदार पाटणी व झनकांनी लावली हजेरीसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागातून कामे करणाºया जलरत्नाचा सत्कार कार्यक्रमासाठी कामाच्या व्यस्ततेतही कारंजा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी व रिसोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी हजेरी लावून जलरत्नांच्या कार्याला मान दिला. आमदार अमित झनक यांना दुसऱ्या कामानिमित्त जायचे असल्यावरही त्यांनी थोडा वेळ का होईना हजेरी लावून आपली उपस्थिती दर्शविली. तर आमदार राजेंद्र पाटणी यांनी सुध्दा काही जलरत्नांचा सत्कार करुन आपल्या पुढील कार्यक्रमाला प्राधान्य दिले.
जलरत्नांच्या सत्काराला प्रमुख मान्यवरांचींच अनुपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:49 PM