शिरपूर जैन : येथील मंडळ अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या तीन तलाठ्यांपैकी बरेचदा एक तलाठी अनुपस्थित राहतात. त्यांच्या अनुपस्थितीचा फटका शेतकºयांना बसत आहे. तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे पेरेपत्रक मिळण्यास विलंब होत असून, नाफेडच्या खरेदीसाठी नोंदणी रखडली आहे.
शिरपूर येथे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कार्यालय आहे. या ठिकाणी मंडळ अधिकारी घनशाम दलाल, तसेच जे. एन.साठे, अंभोरे व अंबुलकर असे तीन तलाठी कार्यरत आहेत. येत्या काही दिवसांत नाफेड मार्फत उडिद, मुग आणि सोयाबीन या शेतमालाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित खरेददार संस्थेकडे शेतामालाची नोंदणी करायची असून, शेतकºयांना तलाठ्यांकडून पेरेपत्रक दाखला आवश्यक आहे; परंतु शिरपूर येथील मंडळ अधिकारी कार्यालयात कर्मचाºयांची अनुपस्थिती राहत असल्याने शेतकºयांना त्याचा फटका बसत आहे. शुक्र वार १३ आॅक्टोंंबर रोजी या ठिकाणी मंडळ अधिकारी दलाल व तलाठी अंबुलकर हे दोघे वगळता इतर दोन तलाठी अनुपस्थित होते. त्यामुळे शिरपूर भाग १ वगळता भाग २ व भाग ३ मधील शेतकºयांना पेरेपत्रक दाखला मिळू शकला नाही. त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त केला. सदर कार्यालयात भेट दिली असता तलाठी जे.एन.साठे हे ११ आॅक्टोंबर पासून कार्यालयात आलेच नसल्याचे, तर तलाठी पी.एस.अंभोरे हे ही १३ आॅक्टोंबर रोजी कार्याल्यात आले नसल्याचे दिसून आले. दरम्यान, तहसीलदारांशी संपर्क साधून माहिती घेतली असता जे. एन. साठे हे ११ आॅक्टोंबरपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले.
नाफेडकडे उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी करावी लागत असून, यासाठी पेरेपत्रक गरजेचे होते; परंतु १३ आॅक्टोबर रोजी मंडळ अधिकारी कार्यालयात गेलो असता तेथे तलाठी जे. एन. साठे आणि पी. एस. अंभोरे उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्हाला अडचणीचा सामना करावा लागला. -सुरेश येवले, शेतकरी शिरपूर