जिल्ह्यात १० जून रोजी तब्बल दीड तास मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर ११ व १२ जून रोजीही पावसाने दमदार हजेरी लावली. सुरुवातीच्या पावसानंतर पेरणीची घाई करणाऱ्या शेतकऱ्यांना १० जूनच्या पावसाचा फटका बसला. अनेकांच्या शेतातून पाणी वाहल्याने बियाणे गेले, तर काहींची जमिनीच खरडली. या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी खबरदारी घेत पेरणी टाळली. त्यानंतर ११ व १२ जून रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतजमिनीत मोठा ओलावा निर्माण झाला. पावसाने उसंत घेतल्यानंतर मात्र रविवारपासून शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला वेग दिला. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव शिवारात तर ४० टक्के पेरणीही पूर्ण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी, मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारातही ३० टक्क्यांच्यावर पेरणी पूर्ण झाली आहे.
-----------------
बियाण्यांच्या तुटवड्याने शेतकरी हतबल
जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने शेतकरी खरीप पेरणीची घाई करीत आहेत. त्यासाठी बियाणे आणि खतांची खरेदी करण्याची लगबग ते करीत आहेत. तथापि, खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तर महाबीजच्या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे.
----
===Photopath===
140621\14wsm_2_14062021_35.jpg
===Caption===
दमदार पावसानंतर खरीप पेरणीला वेग