काही शेतकरी हवामानाचा अंदाज घेत कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पेरणीची जुळवाजुळव करीत आहेत. मृग नक्षत्राच्या पावसाने काजळेश्वर परिसर सततच्या ७ ते १० जूनपर्यंतच्या पावसाने जमिनीत ओलावा पेरणीयोग्य काजळेश्वर परिसरात निर्माण झाला. मात्र, त्यापुढे पावसाची उघडझाप असल्याने शेतकरी पेरणीपूर्व वखरण करीत आहेत तर काहींनी पेरणी सुरू केली आहे. हवामानाचा अंदाज घेत कृषी विभागाच्या सूचनेनुसार १७ जूनपर्यंत पेरणी करू नका, असे सुचविले होते. त्यानुसार अनेक शेतकरी पेरणीसाठी थांबलेत. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीची जुळवाजुळव केल्याने शेतकरी सध्यातरी शेतीकामात दंग आहे.
..........................
पूल नादुरुस्त, वाहतुकीस अडथळा
काजळेश्वर : गतवर्षी खरीप हंगामाचे सोंगणीच्या वेळी आलेल्या अतिवृष्टीने काजळेश्वर ते पानगव्हान रोडवरील पानगव्हान गावाजवळच्या नाल्यावर असलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला, तेव्हापासून त्या पुलाचे काम संबंधित विभागाकडून केले गेले नाही. आता मात्र त्याच नाल्याला आलेल्या पुराने तोच पूल अधिक क्षतीग्रस्त झाला. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे.
काजळेश्वर ते पानगव्हान या गावांना जोडणारा डांबरी रस्ता सध्या तरी दुर्लक्षित आहे. त्यामुळे काजळेश्वरचे पानगव्हान शेतशिवारात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर येण्या-जाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पो. पा. संदीप सुपनर, युवा शेतकरी डॉ. अन्ना ताठे यांनी केली आहे.