----
शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांतच अडकले
वाशिम : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. आधीच कोरोनामुळे महाविद्यालये वर्षभरापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे.
-------
बांधावर पोहोचल्या २.०० कोटींच्या निविष्ठा
वाशिम : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १५ जूनपासून माझी उपजीविका समृद्धी मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यात ग्रामसंघाकडून २ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आल्या आहेत.
^^^^^^^
मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित
वाशिम : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना कुशल कामाची देयकेही अद्याप मिळालेली नाहीत. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
----------
ग्रामीण भागांत अनियमित वीजपुरवठा
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण परिसरात आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी, तर घरातील पंखे बंद राहत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
--------------
वाहनांवर कारवाईचा धडाका
वाशिम : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची मोहीम सुरू आहे. याअंतर्गत सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाशिम- पुसद मार्गावर वाहतूक पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी करताना २७ वाहनांवर कारवाई केली.