लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) :औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावर कारंजाकडून मालेगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने १३ वर्षीय मुलासह बकरीला चिरडल्याची घटना मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ रविवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. सतिष टोंचर असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने आग लावून ट्रक पेटवून दिला. यामुळे मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती.अलिकडच्या काळात औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील शेलुबाजारनजीक वाहन अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. संभाव्य वाहन अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अद्याप याची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी कारंजाकडून मालेगावकडे जाणाºया ट्रकने शेलुबाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ १३ वर्षीय सतिष संजय टोंचर या मुलासह बकरीला चिरडले. या दुर्घटनेत सतीष टोंचर व बकरी जागीच ठार झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने चालकाला बाहेर काढून सदर ट्रकला आग लावून पेटवून दिले. घटनेनंतर तब्बल दोन तास नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील वाहतुक ठप्प होती.
औरंगाबाद-नागपूर मार्गावर ट्रकने मुलास चिरडले; संतप्त जमावाने ट्रक पेटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 2:19 PM
शेलूबाजार (वाशिम) :औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावर कारंजाकडून मालेगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने १३ वर्षीय मुलासह बकरीला चिरडले.
ठळक मुद्देसतिष टोंचर असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.या घटनेनंतर संतप्त जमावाने आग लावून ट्रक पेटवून दिला.यामुळे मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती.