ठळक मुद्देजून ते सप्टेंबर या कालावधीत अपघाताच्या ११९ घटना घडल्या. यामध्ये ६३ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
- शिखरचंद बागरेचा वाशिम : लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा वाहनांचा भरधाव वेगाने प्रवास सुरू झाला असून, अपघाताच्या घटना आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. चालू वर्षात जून ते सप्टेंबर या कालावधीत अपघाताच्या ११९ घटना घडल्या असून, यामध्ये ६३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यंदा कोरोनाचे संकट असल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च ते मे महिन्यापर्यंत लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. जानेवारी ते मार्च यादरम्यान जिल्ह्यात अपघाताच्या ३८ घटना होत्या. लाॅकडाऊनदरम्यान केवळ सात अपघात झाले होते. लाॅकडाऊन खुला झाल्यानंतर तब्बल ११९ अपघाती घटना घडल्या.