शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

लेखा कर्मचारी सामूहिक रजेवर

By admin | Published: July 05, 2014 12:47 AM

वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गमत सर्व विभागातील लेखा कर्मचार्‍यांनी ४ जुलैपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे.

वाशिम : लेखा संवर्गाची बिंदू नामावली मंजुर करुन घेऊन रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गमत सर्व विभागातील लेखा कर्मचार्‍यांनी ४ जुलैपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाचा जिल्हापरिषदेतील लेखा विभागासह अन्य विभागातील लेखा व्यवहारांवर परिणाम होत आहे.२७ नोव्हेंबर २00९ रोजी लेखा संवर्गीय बिंदू नामावलीला मागासवर्गीय कक्ष उप आयुक्त अमरावती यांच्याकडून मंजुरी प्रदान झालेली आहे. त्यानुषंगाने ७ नोव्हेंबर २0१२ ला सदर बिंदू नामावलीस तीन वष्रे पुर्ण झाली आहेत. बिंदू नामावलीचा नवीन प्रस्ताव तयार करुन उपायुक्तांकडून मंजुरी घेण्ो आवश्यक होते. त्यानुसार वित्त विभागाने मागासवर्गीय कक्षाकडे प्रस्ताव सादर केलेला असताना २७ नोव्हेंबर २0१२ ते आतापर्यंत दोन वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे, तरीसुध्दा वित्त विभागाची बिंदू नामावली मंजूर झालेली नाही. बिंदू नामावली मंजुर झालेली नसल्यामुळे वित्त विभागातील रिक्त पदे पदोन्नतीने, सरळसेवेने भरणे शक्य होत नाही.परिणामी रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कर्मचार्‍यांवर अतिरिक्त प्रभाराचा बोजा पडत आहे.त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर तसेच कर्मचार्‍यांच्या प्रकृतीवर होत आहे.याबाबीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्यावतीने वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. याबाबत संघटनेने उपरोक्त संदर्भान्वये वारंवार पत्रव्यवहार करुन तथा भेटी देऊन पाठपुरावा करून तसेच बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.परंतु प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनामुळे सदर आंदोलन स्थगित ठेवण्यात आले होते. परंतु याबाबत अद्यापपर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने सर्वानुमते ४ जुलै ते ११ जुलैपर्यंत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय संघटनेच्या सभेत घेण्यात आला होता.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देऊनही मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह कर्मचारी ४ जुलैपासून सामूहिक रजेवर गेले आहेत.यामध्ये जि.प.लेखा विभागातील २0 कर्मचार्‍यांसह अन्य विभाग व पंचायत समित्यांमधील लेखा कर्मचार्‍यांचा समावेश आहे.यामुळे जिल्हापरिषद लेखा विभागात ४ जुलै रोजी शुकशुकाट पसरलेला होता.या आंदोलनाचा परिणाम जिल्हापरिषदेतील लेखा विभागासह अन्य विभागांमधील तसेच पंचायत समित्यांमधील लेखाविषयक कामकाजावर झाला.हे आंदोलन ११ जुलैपर्यत सुरुच राहील अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष रा.रा.ढंगारे यांनी दिली आहे.