0000
करडा परिसरात वीजपुरवठा खंडित
वाशिम : रिसोड तालुक्यातील करडा परिसरातील काही गावांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
00000000000000000
०००
कवठा येथे आरोग्य तपासणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील कवठा येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
००
देयके अदा करण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यातील ५६ हजारांवर ग्राहकांकडे ४९ कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन महावितरणने केले.
००
अतिक्रमणाचे सर्वेक्षण केव्हा होणार?
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. कोरोनाकाळात सर्वेक्षण रखडले होते. आता कोरोनाचा आलेख खाली आल्याने सर्वेक्षण करण्याची मागणी समोर आली आहे.
००००००
संरक्षक समित्यांनी सतर्क राहावे !
वाशिम : बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती स्थापन केली. गावात किंवा परिसरात कुठेही बालविवाह होत असल्यास तो रोखण्यासाठी समितीमधील सदस्यांनी नियमित सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने सोमवारी केले.