लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोराना विषाणुच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिक घरातून निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघाल्यास फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु तरीही काही नागरिक नियमांचे, आदेशांचे पालन करीत नसल्याने एकाच दिवशी तब्बल १५० जणांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी संचारबंदीत नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतिने करण्यात येत आहे. तरी सुध्दा काही नागरिक आपल्या जिल्हयात काहीच धोका नाही या अर्विभावात शहरात फिरतांना दिसून येत आहे. याकरिता पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोडे यांच्या नेतृत्वात वाशिम पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगीता भारव्दाज , शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक राजु वाटाणे यांच्यासह पोलीसांनी शहरातील आंबेडकर चौकामध्ये ३० एप्रिल रोजी मोठया प्रमाणात कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मास्क न वापरणाºया ६५ जणांवर दंडात्मक, वाहनांवर नंबरप्लेट नसणे, लायसन्ससह वाहनाची कागपदपत्रे नसणे तसेच डबल -तिबल सिट वाहन चालविणाºयांना १३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई नियमित सुरु राहणार असल्याचे यावेळी वाशिम पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगीता भारव्दाज यांनी सांगितले. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. एक हजाराच्यावर नागरिकांची चौकशीवाशिम शहरात गुरुवार सकाळपासून अचानक पोलीसांनी नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. यामध्ये शहरातील विविध चौकात एक हजाराच्यावर नागरिकांची चौकशी करण्यात आली. संचारबंदी काळात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व प्रशासनाच्यावतिने करण्यात आलेल्या आवाहनाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात आहे-वसंत परदेसीपोलीस अधीक्षक, वाशिम
नागरिकांनी प्रशाासनाने केलेल्या आवाहनाचे पालन करावे, उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाई केल्या जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे-योगीता भारव्दाजठाणेदार, वाशिम शहर पोलीस स्टेशन