लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी चेहºयावर मास्क लावणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर परिषदेने गत दोन दिवसात २७ नागरिकांकडून ५४०० रुपये दंड वसूल केला.मास्क न लावणाºया व्यक्तीविरूद्ध नगर परिषदेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता रिसोड शहरासह तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी चेहºयावर मास्क किंवा रुमाल बांधावा, याबाबत सुरूवातीला जनजागृतीही करण्यात आली. त्यानंतर मास्क किंवा रूमाल न लावणºया नागरिकांविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली. शहरातील संत अमरदास बाबा यात्रा मैदान येथे नगर पालीका प्रशासनाने भाजी विर्केत्यांना भाजी मार्केट करीता जागा उपलब्घ करून दिली. मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी या ठिकाणी भेट दिली असता काही नागरीक चेहºयावर मास्क न लावताच भाजी मार्केट मध्ये आढळुन आले. दरम्यान जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी पांडे यांनी चेहºयावर मास्क न लावणाºया २७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना ताकीद दिली.
मास्क न लावणाऱ्या २७ नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 4:28 PM