वाशिम : काेराेनाचा वाढत संसर्ग पाहता, जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांनी प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. मास्कचा वापर न करणऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकेतर्फे कारवाईची माेहीम हाती घेतली आहे. वाशिम नगरपरिषदेतर्फे दुकानात जाऊन विनामास्क असणाऱ्या दुकानदारांसह रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी माेहीम हाती घेतली आहे. यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाशिम नगरपरिषदेच्या वतीने मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा हाती घेतल्याने, नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. २० फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या माेहिमेमध्ये एकूण ६५ व्यक्ती, दुकानदारांवर कारवाई करून, त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एकूण दंड ४३ हजार इतका असून, नागरिकांनी मास्कचा वापर करा व कारवाई टाळा, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात येत आहे.
...............
मास्क वापरा, कारवाई टाळा
मास्क न लावणाऱ्यांवर हाती घेण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात प्रशासनाने ‘मास्क लावा, कारवाई टाळा’चे आवाहन केले आहे.
काेराेनाबाधितांची संख्या पाहता, कारवाई अधिक गतिमान केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी सांगितले.
कारवाई करताना वाद न घालता मास्कचा वापर करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. यामध्ये काेणाची हयगय केली जाणार नाही
.............
माेहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे
जिल्हाधिकारी शण्मुगराज एस. यांनी दिलेल्या आदेशान्वये विनामास्क फिरणाऱ्यासह दुकानदार व इतर नागरिकांवर कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. या माेहिमेंतर्गत काेणाचीही हयगय केली जात नाही. नागरिकांनी मास्कचा वापर करून सहकार्य करावे.
- दीपक माेरे
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
.....
शहरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या माेहिमेंतर्गंत मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात येत आहे. पथकासाेबत काही नागरिक वाद घालत आहेत हे चुकीचे आहे. सर्वांचे आराेग्य लक्षात घेता, नागरिकांनी सहकार्य करावे.
-तेजस पाटील
उपमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
.........
पाेलीस विभागाचेही नगरपालिकेला सहकार्य
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नगरपालिका, पाेलीस विभागाच्या वतीने मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पाेलीस विभागाच्या वतीने वाहनधारकांवर कारवाईची माेहीम राबविण्यात येत आहे. नगरपालिकेच्या वतीने पथक तयार करण्यात आले असून, या पथकामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अनेक जण वाद घालत असल्याने, पाेलीस विभागाच्या वतीने प्रत्येक पथकात एक कर्मचारी दिसून येत आहे.
.......
पथकामध्ये सहभागी अधिकारी, कर्मचारी
नगरपालिकेच्या पथकामध्ये उपमुख्याधिकारी तेजस पाटील यांच्यासह नगरपरिषदेतील विविध विभागांतील कर्मचारी सहभागी आहेत. यामध्ये कुणाल कणाेजे, दत्तात्रय देशपांडे, राजू यादव, मनाेज इंगळे, सारिका आळणे, विजयश्री खंडेराव, केशव खाेटे, पाेलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.