वाशिम : जिल्हा पोलीस दलातील २०० पेक्षा अधिक अधिकारी व अंमलदार हे कोरोना बाधित असतानाही समर्थपणे जनतेचे रक्षण करीत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिला आहे.
.....................
नवोदयची प्रवेश परीक्षा १६ मे रोजी
वाशिम : जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग सहावीकरिता प्रवेश परीक्षा यापूर्वी १० एप्रिल रोजी होणार होती. काही प्रशासकीय कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली असून सदर परीक्षा आता रविवार, १६ मे रोजी होणार आहे, अशी माहिती प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी दिली.
................
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाचा प्रकोप दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. त्यापासून बचावाकरिता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.
...................
नियमांबाबत वाहकांचे उद्बोधन
वाशिम : महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या बस ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून यासंबंधी शुक्रवारी वाहकांचे उद्बोधन करण्यात आले.
...................
मास्क वापराकडे नागरिकांचे दुर्लक्ष
वाशिम : कोरोनापासून बचावासाठी तोंडाला सतत मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. असे असताना बाजारपेठेत फिरणाऱ्या काही नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार शुक्रवारी वाशिममध्ये दिसून आला.
.............
उद्योगांना पुरेसे पाणी मिळेना
वाशिम : येथील एमआयडीसीमध्ये जेमतेम ११ ते १२ उद्योग सुरू आहेत. त्यांनाही पुरेसे पाणी मिळत नाही. एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढवून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी उद्योजकांमधून होत आहे.