लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संचारबंदी शिथीलतेत चक्क रस्त्यावर वाहने उभी करुन खरेदीसाठी जाणाºया वाहनधारकांवर पोलीस विभागाच्यावतिने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक चौकात गुन्हा दाखल केल्या जात आहे. यासंदर्भात १० मे रोजी लोकमतच्यावतिने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.कोरोनाच्या पृष्ठभूमिवर अत्यावश्यक सेवसोबत काही महत्वाच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आल्याने शहरात एकच गर्दी होत असून रस्त्यावर सर्वत्र वाहने धावतांना दिसून येत आहेत. पोलीस कर्मचाºयांना सुध्दा वाहतूक सुरळीत करण्यात मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात काही महाभाग रस्त्यात वाहने उभी करुन खरेदी करीत असल्याने विस्कळीत वाहतुकीचा फटका सर्वाना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्तांकन लोकमतच्यावतिने करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.या वृत्ताची दखल घेत पोलीस प्रशासनाच्यावतिने रस्त्यात वाहने उभी करण्यासह , विना मास्क शहरात फिरणाºयांवर कारवाई सुरु केली आहे. वाशिम शहर ग्रीन झोनमध्ये असल्याने बºयापैकी व्यवसाय शहरात सुरु झाले आहेत. व्यवसाय करताना काही नियम व वेळेचे बंधनानुसार फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. तसेच दुकाने उघडण्याची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत असल्याने यावेळेत खरेदीदारांची शहरात एकच गर्दी होत आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याकडेही नागरिक दुर्लक्ष करीत असून चक्क रस्त्यावर वाहने उभी करुन खरेदीसाठी जात असल्याने सर्व नागरिकांना काही नागरिकांमुळे त्रास सहन करावा लागत होता, पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच रस्त्यात वाहन उभे करण्याच्या प्रकारात बºयापैकी अंकुश लागल्याचे दिसून येत आहे.
वाशिम येथे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 5:56 PM