लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर समाजाची दिशाभूल करणारे आणि अफवा पसरविणारे मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्तींकडून केला जात आहे. अशा व्यक्तींवर यापुढे नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला.कोरोनाकाळात अनेकजण समाज माध्यमांवर विविध प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करीत आहेत. काही अपप्रवृत्तींकडून तर दिशाभूल करणारे मेसेजही फॉरवर्ड होत असल्याचे दिसून येते. मध्यंतरी एका डॉक्टरसंदर्भात असाच चुकीचा मेसेज फॉरवर्ड केल्याने संबंधित डॉक्टर व कुटुंबियांना मनस्तापही सहन करावा लागला. कोरोना काळात काय करावे आणि काय करू नये, कुठल्या वस्तू वापराव्यात आणि कुठल्या वापरू नये, यासंबंधीची माहिती अशा मेसेजमध्ये असते. त्यातील माहिती दिशाभूल करणारी आणि अशास्त्रीय आहे. अशा मेसेजमधून समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल, प्रशासनाची दिशाभूल होईल, असे चुकीचे मेसेज कुणीही फॉरवर्ड करू नये, चुकीचे व दिशाभूल करणारे मेसेज कुणी फॉरवर्ड केले तर संंबंधितांविरूद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला.
फेक मेसेजमध्ये काय?अमरावती विभागात अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या पदनामाचा गैरवापर करून कोरोनांसदर्भात दिशाभूल करणारे मेसेजेस् फॉरवर्ड केले जात आहेत. जसे की, कोरोना तिसºया टप्प्यात जाणार असल्याचा उल्लेख करून वृत्तपत्र बंद करा, ब्रेड-पाव किंवा बेकरी साहित्य बंद करा, शेजाºयांना येऊ देऊ नका, सर्वच गरजांसाठी गरम पाणी वापरा, अशा टिप्स त्यात दिल्या जात आहेत. त्याशिवाय आणखी बºयाच बाबी लिहिल्या आहेत. मात्र, अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ते फॉरवर्ड करू नका.
अफवा पसरविणारे मेसेज आल्यास पोलीस वा जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.कोरोनाबाबत पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. इतरांनीदेखील दक्षता घेऊन समाज माध्यमांवर फेक मेसेजद्वारे संभ्रम, दिशाभूल निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. समाज माध्यमांवर दिशाभूल मेसेज फॉरवर्ड करणाºयांविरूद्ध निश्चितच कारवाई केली जाईल- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम
कोरोनाबाबत चुकीची माहिती पसरविणे हा दंडनीय गुन्हा आहे. समाज माध्यमांवर दिशाभूल पोस्ट कुणीही टाकू नये किंवा फॉरवर्ड करू नये. दिशाभूल पोस्ट टाकणारे, फॉरवर्ड करणारे हे दोघेही दोषी ठरणार आहेत. नागरिकांनी अधिक दक्ष राहावे.- डॉ. पवन बन्सोड,उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम