कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज नगरपरिषदेच्या पथकांनी तीन दुकानांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच चेहºयावर मास्क न लावता शहरात फिरणाऱ्या १३ व्यक्तींवर नगरपरिषदेच्या पथकांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती कारंजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी दिली आहे. तसेच यापुढेही शहरात तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाºया व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना चेहऱ्यावर मास्क लावून घराबाहेर पडावे, तसेच एकाच ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारंजात आणखी दोन दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:40 AM