...........
विज जोडणीची कारवाई थांबवा!
वाशिम : थकबाकीदार ग्राहकांची विज तोडण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे; मात्र कोरोना संकटामुळे आधीच नागरिक जेरीस आले आहेत. त्यामुळे किमान काही दिवस कारवाई थांबवावी, अशी मागणी चेतन शिंदे यांनी सोमवारी केली.
.............
रस्त्यांची कामे मार्गी लागणार
वाशिम : शहर विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून विशेषत: मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत, अशी माहिती खासदार भावना गवळी यांनी सोमवारी दिली.
........
वाहतुक ठप्प, वाहनचालक त्रस्त
वाशिम : शहरातील पोस्ट आॅफीस चौकातून गेलेल्या महामार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास वाहतुक काहीकाळ जागीच ठप्प झाली होती. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले. राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असल्याने हा प्रश्न उद्भवल्याची माहिती आहे.
...........
एक्सप्रेस रेल्वेला प्रवाशी मिळेना
वाशिम : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केवळ आरक्षित पद्धतीने काही एक्सप्रेस रेल्वे वाशिममार्गे धावत आहेत; मात्र त्यास प्रवाशीच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक आसने यामुळे रिक्त राहत आहेत.
............
‘एबी’ केबलमुळे चोरीस आळा
वाशिम : ‘एअर बंच’मुळे (एबी केबल) विजचोरीस बहुतांशी आळा बसला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारचे केबल टाकण्यात आल्याने महावितरणचा फायदा होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
................
जप्तीची वाहने झाली भंगार
वाशिम : स्थानिक शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीची अनेक वाहने जागीच भंगार झाली आहेत. मध्यंतरी पोलीस अधीक्षकांनी काही वाहने मूळ मालकास परत करण्याची कार्यवाही केली होती, हे विशेष.
............
पावभाजी विक्रेते आर्थिक संकटात
वाशिम : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची पावभाजी प्रामुख्याने सायंकाळीच मिळते; मात्र सायंकाळी पाचनंतर व्यवसाय बंद राहत असल्याने पावभाजी मिळत नसून या व्यवसायात असलेले व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत.
............
जऊळका येथे कोरोनाविषयक मार्गदर्शन
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आरोग्य विभागाकडून सोमवारी कोरोनाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
.............
अवैध प्रवाशी वाहतुक जोरात
वाशिम : किन्हीराजा येथून मालेगाव व कारंजाकडे अवैध प्रवाशी वाहतुक करणारी वाहने धावत आहेत. हा प्रकार सध्या जोरासोरात सुरू आहे. एस.टी. फेºयांची संख्या कमी झाल्याने अवैध वाहतुकदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे.
............
क्रीडांगणावर शुकशुकाट
वाशिम : मालेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीत रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. भीतीपोटी क्रीडांगणावरही शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.