वाशिम - गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरूद्धची कारवाईची मोहिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने तीव्र केली आहे. गुड मॉर्निंग पथकाने रिसोड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन १२ लोकांवर दंडात्मक कारवाई केली.गुड मॉर्निंग पथकाने रिठद येथे भेट दिली असता, १२ जण उघड्यावर शौचास जात असल्याचे आढळून आले. या सर्वांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली तसेच सवड येथेदेखील पाच जण उघड्यावर शौचास जात असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्रत्येकी १२०० रुपये दंड वसूल केला. ही रक्कम ग्रामपंचायतला देण्यात आली. यापुढे ही मोहिम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे स्वच्छता कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे यांनी सांगितले.
लोटाबहाद्दरांविरूद्ध कारवाईची मोहिम
By admin | Published: July 17, 2017 1:55 PM