ग्रामीण भागात चुलीला गतवैभव
उंबर्डाबाजार : उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्व प्रकारच्या गॅस सिलिंडरच्या किमतींत गेल्या दोन महिन्यांत मोठी वाढ झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना गॅस विकत घेणे परवडेनासे झाले असल्याने, पर्यायाने ग्रामीण भागात विझलेल्या चुली आता पुन्हा पेटू लागल्या आहेत.
तोंडगाव येथे आढळले तीन काेरोनाबाधित
वाशिम : आराेग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथील तीनजण २७ मे राेजी काेराेनाबाधित आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपळगाव परिसरात आठजण काेराेनाबाधित
वाशिम : तालुक्यातील पिंपळगाव येथे आठजण गुरुवारी काेराेनाबाधित आढळून आले. पिंपळगाव येथे आराेग्य विभागाच्या वतीने ग्रामस्थांची तपासणी करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी काेराेना चाचणी करून घेण्याचे आवाहन आराेग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.