लोकमत न्यूज नेटवर्क मेडशी (वाशिम) : येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राला आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. साधना तायडे यांनी ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान आकस्मिक भेट दिली. यावेळी मेडशी बसस्थानकावर तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत धुम्रपान करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. साधना तायडे यांनी आपल भेटीदरम्यान मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. डी. आर. ससे, कुष्ठरोग नियंत्रक डॉ. सेलोकार, जिल्हा तंबाखु नियंत्रक समन्वयक डॉ. पाढारकर नेत्र विभागाचे डॉ. चन्दोलकार, जिल्हा समुह संघटक उन्द्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोरसे, निलेश राजपुत, तालुका समुह संघटक मोहम्मद नूर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेंडे,प्रेरणा प्रकल्प, कुष्ठरोग नियंत्रक ,तंबाखु नियंत्रन कार्यक्रम, आरोग्य विभागाचे विविध कार्यक्रमाचे अधिकारी हजर होते. यावेळी गोवर, रूबेला लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलामुलींना जनजागृती करुन मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तसेच जिल्ह्यात ५ रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली असून, मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच एक रुग्णवाहिका भेटणार आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे लवकरच विद्युतीकरण करून या इमारतीचे हस्तांतरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अहेर यांनी दिली.
तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 3:06 PM