000000000000000000
करडा येथे दोन रुग्ण आढळले
वाशिम : रिसोड तालुक्यातील करडा येथे आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल २२ जून रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित केली असून, काही लक्षणे असल्यास चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००००
५२ पाणंद रस्त्यांची कामे ठप्प
वाशिम : पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी वाशिम, मालेगाव व रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार केली होती. मात्र, अद्यापही ५२ पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही.
००००००
घरकुल बांधकामासाठी रेती मिळेना
वाशिम : जिल्ह्यात घरकुलांचे बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र रेतीघाट लिलाव झाले नसल्याने रेतीच उपलब्ध नाही. त्यामुळे बांधकामे प्रभावित होत आहेत. रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थींमधून २१ जून रोजी झाली.
०००००
हराळ परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : हराळ, कवठा परिसरातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी सोमवारी केली.
००००