जिल्हाधिकारी म्हणाले, कारंजा तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या चिंताजनक बाब आहे. शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनाची कठोर अंमलबजावणी होणे आता आवश्यक आहे. अजूनही अनेकजण मास्क वापरत नसल्याचे, तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण भागातील दुकाने, आस्थापनांमध्ये कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाºयांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. यामध्ये कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून हयगय होता कामा नये; अन्यथा नाईलाजाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकाºयांनी दिला.
कोरोना संसर्गाची लक्षणे असलेला रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे गेल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी त्याची कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही होत असल्याची खातरजमा आरोग्य विभागाने करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.