लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील महात्मा फुले मार्केटमध्ये वरली, मटका खेळताना एका इसमावर व देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या एका इसमावर अशाप्रकारे दोन इसमांवर शिवाजी चौकी पोलिसांनी १२ जुलै रोजी कारवाई केली. शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरात अनिल पंजाबराव तायडे (रा. लहूजी नगर, वाशिम) हा इसम वरली, मटका चिठ्ठी लिहिताना आढळून आला. त्याच्याजवळील सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले. शहरातून वरली मटक्याचा व्यवसाय हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातून शहर पोलीस स्टेशनने विशेष मोहीम हाती घेतली आहे. दुसऱ्या एका घटनेत शिवाजी चौकी परिसरामधून नारायण माणिकराव खडसे (रा. काळे फैल, वाशिम) हा इसम देशी दारूच्या बॉटल घेऊन जात असल्याचा संशय पोलिसांना आला. खडसे याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे देशी दारूच्या २० बॉटल आढळून आल्या. दारू विक्रेत्यांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे.या दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक पाटकर यांच्या मार्गदर्शनात शिवाजी चौक पोलीस चौकीचे जमादार नितीन काळे, विष्णू भोंडे, सतीश गुडदे, धनंजय अरखराव यांच्या पथकाने केली. या घटनेची जमादार काळे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, पोलिसांनी अनिल तायडे व नारायण खडसे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
वरली-मटका, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
By admin | Published: July 13, 2017 1:44 AM