शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 3:14 PM

इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे. तथापि, आता या प्रकल्पातील पातळीत झपाट्याने घट होत असल्याने पुढील वर्षी अपुरा पाऊस पडल्यास या प्रकल्पावर अवलंबून गावांतही पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भिती आहे.जिल्ह्यातून वाहणाºया आणि मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीवर वाशिम जिल्ह्याच्या अगदी टोकावर कारंजा तालुक्यात मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे. या प्रकल्पाची उंची पायथ्यापासून सुमारे ३०.१३ मी (९८.९ फूट) आणि लांबी ७५५ मी (२,४७७ फूट) इतकी आहे. या प्रकल्पाची साठवणक्षमता ५.०४़१०१३ घन फूट असून पूर्ण भरण क्षमता २.७६५८४५़१०१५ घन फूट इतकी आहे. हा प्रकल्प गोदावरीच्या खोºयात येतो. या प्रकल्पावर शेकडो हेक्टर क्षेत्रात सिंचनही केले जाते. यात वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांनाही फायदा होतो. निर्मितीपासून आजवरही या प्रकल्पाच्या भरवशावर असलेल्या शहरांत पाणीटंचाईची समस्या फारशी जाणवली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने या प्रकल्पातून कारंजा शहराची तहान भागविली जाते, तसेच २४ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरातील ८ गावे आणि मानोरा तालुक्यातील १६ गावांची तहान भागविली जाते. रखरखत्या उन्हामुळे जिल्ह्यातील ८० प्रकल्प कोरडे पडले असताना आणि उर्वरित प्रकल्पांनी तळ गाठला असताना अडाण प्रकल्पात २० टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. त्यामुळेच या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या कारंजा शहरासह २४ गावांत मुबलक पाणी पुरवठा होत आहे. गाळ उपसा करण्याची गरजगेल्या अनेक वर्षांपासून अडाण प्रकल्पाची पातळी कधीही १५ टक्क्यांच्या खाली गेली नाही. दरवर्षीच्या पावसाळ्यात नदीत वाहून येणारा गाळ या प्रकल्पात साचल्याने प्रकल्पाची साठवण क्षमता कमी झाली आहे. काही शेतकरी स्वयंस्फूर्तीने या प्रकल्पाच्या कोरड्या भागातून गाळाचा उपसा करीत असले तरी, त्याचा म्हणावा तेवढा फायदा खोलीकरणास होत नाही. त्यामुळे शासनाने गाळयुक्त शिवार, गाळमूक्त धरण अभियानांतर्गत या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून शेतकºयांना गाळ नेण्यास प्रोत्साहीत करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :WaterपाणीwashimवाशिमKaranjaकारंजा