शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

शेतीला ‘इस्त्राईल’ तंत्रज्ञानाची जोड; स्वयंचलित खते, पाण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 11:34 AM

‘आॅटोमेशन’ तंत्रज्ञानाने स्वयंचलित पद्धतीने पिकांना खते व पाणी दिले जात असल्याने वेळ व पाण्याची बचत होण्याबरोबरच उत्पादनात वाढ झाली आहे.

- अमोल कल्याणकरलोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : इस्त्राईल देशातील ‘आॅटोमेशन’ या तंत्रज्ञानाची जोड देत तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली आहे. ‘आॅटोमेशन’ तंत्रज्ञानाने स्वयंचलित पद्धतीने पिकांना खते व पाणी दिले जात असल्याने वेळ व पाण्याची बचत होण्याबरोबरच उत्पादनात वाढ झाली आहे.डोंगरकिन्ही येथील डॉ. हेमंत देशमुख यांच्याकडे वडीलोपार्जित ३५ एकर शेती असून, २००८ पासून ते शेती सांभाळत आहेत. शेतामध्ये नवनवीन प्रयोग करीत त्यांनी शेतीचा कायापालट केला. सिंचनाची सुविधा म्हणून सुरूवातीला विहिर आणि त्यानंतर पाच बोअर घेतले. दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार करीत पाण्याची साठवणूकही केली. पिकांना आवश्यक तेवढेच खत व पाणी मिळावे याकरीता खत व पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ते इस्त्राईल तंत्रज्ञानाकडे वळाले. ‘आॅटोमेशन’ तंत्रज्ञानाची जोड देऊन ते शेती करीत आहेत. कोणत्या पिकाला किती पाणी व खत द्यायचे ते सर्व एका जागेवर बसून ‘आॅपरेट’ केले जाते. पाण्याची बचत होत असल्याने ते वर्षभर फळबाग, भाजीपाला व अन्य पिके घेतात. केळी, पपई, संत्रा या फळबागेसोबतच हळद, मिरची, टोमॅटो, कांदा बियाणे आदी भाजीपालावर्गीय पिकांतून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. सेंद्रीय पद्धतीने शेती करणाºया डॉ. देशमुख यांनी शेतात ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून शेतीवर वॉचही ठेवतात. शेतीत केलेल्या नानाविध प्रयोगाची दखल म्हणून यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय शेतीनिष्ठ पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाासह कृषी विज्ञान केंद्र करडाकडूनही पुरस्कार मिळाले आहेत.आॅटोमेशन तंत्रज्ञानानुसार, डॉ. देशमुख यांनी शेतात एक खोली बांधकाम करून तेथे इस्त्राईल तंत्रज्ञानाने सुसज्ज असे संगणकीकृत खते आणि पाणी देण्याच्या सर्व मशिन बसविल्या. त्यावर वेळ सेट केल्या जाते आणि कोणत्या पिकाला किती पाणी व खते द्यायचे त्याचे प्रमाण ठरवून, एका जागेवर बसून हे सर्व आॅपरेट केले जाते. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे भरघोष उत्पादन घेता येत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी