-----------------
धानोरा प्रकल्पाची दुरुस्ती प्रलंबित
वाशिम: मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे उभारलेल्या सिंचन प्रकल्पाच्या गेटमधून पाणी वाहून गेल्याने काठोकाठ भरलेला हा प्रकल्प उन्हाळ्यापूर्वीच आटला. चार वर्षांपासून दुरुस्तीच न केल्याने हा प्रकार घडला असून, अद्यापही या प्रकल्पाची दुरुस्ती झालेली नाही.
----------------
बंद पडलेले हातपंप सुरु करावेत !
वाशिम: कारंजा तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप मागील बºयाच महिन्यांपासून बंद आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या अर्थसहाय्य योजनेचाया वाटसरूना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे, म्हणून हे हातपंप दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केली आहे.
-------------
साथरोगासाठी ग्रामस्थांची तपासणी
वाशिम: पावसाळ्यात साथीचे आजार लक्षात घेता वेळीच उपचार व्हावेत म्हणून कारंजा तालुका आरोग्य विभागाने तपासणी मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शनिवारी करण्यात आली.
------------
आरोग्य विषयक माहितीचे संकलन
वाशिम: ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी सहकार्य करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. इंझोरीत या समितीकडून शुक्रवारी ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली.
------
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा
वाशिम: गतवर्षी एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे धनज बु परिसरात फळबागांसह पिकांचे नुकसान अतोनात झाले; मात्र नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. याची दखल घेण्याची मागणी आहे.