-----------------
पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ
वाशिम : तालुक्यातील ३५ सिंचन प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. तथापि, काही प्रकल्पाच्या गेटमध्ये लिकेज असल्याने या प्रकल्पातून पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे प्रकल्प लवकर आटण्याची भीती आहे.
----------------
ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागात अनेक रुग्णांची तपासणी सोमवारी करण्यात आली.
------------
आरोग्यविषयक माहितीचे संकलन
वाशिम : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सहकार्य करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम समिती स्थापन करण्यात आली आहे. गावागावात या समितीकडून सोमवारी ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली.
------