-----------------
प्रकल्पाच्या पातळीत वाढ
वाशिम: मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील सिंचन प्रकल्पाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. तथापि, या प्रकल्पाच्या गेटमध्ये लिकेज असल्याने या प्रकल्पातून पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे प्रकल्प लवकर आटण्याची भीती आहे.
----------------
ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
वाशिम: सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून कारंजा तालुका आरोग्य विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी सोमवारी करण्यात आली.
------------
आरोग्यविषयक माहितीचे संकलन
वाशिम: ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सहकार्य करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. इंझोरीत या समितीकडून सोमवारी ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली.
------
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा
वाशिम: गतवर्षी ३१ मार्च ते १ एप्रिलदरम्यानच्या अवकाळी पावसामुळे कवठळ, कोठारी परिसरात फळबागांसह पिकांचे नुकसान अतोनात झाले; मात्र नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. याची दखल घेण्याची मागणी आहे.
-----
शिवमंदिर परिसरात शुकशुकाट
वाशिम: कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश आहे. त्यामुळे भाविक मंदिरांकडे येत नसल्यान इंझोरी येथील शिवमंदिर परिसरात सकाळ व सायंकाळची वेळ सोडल्यास दिवसभर शुकशुकाट राहत आहे.
---------------