लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८-१९ या वर्षातील संचमान्यतेनुसार जिल्हा परिषद शाळेतील ६० शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. २४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात या अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने रिक्त पदांवर समायोजन केले जाणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७६० च्या आसपास प्राथमिक शाळा असून, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते. सन २०१८-१९ या वर्षातील संचमान्यता पुर्ण झाली असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवरील एकूण ६० शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. तालुकानिहाय पंचायत समिती स्तरावर अतिरिक्त शिक्षकांच्या याद्या प्रकाशित केल्या असून, रिक्त पदांवर २४ जानेवारी रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी.ए. तुमराम, उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्यासह गटशिक्षणाधिकाºयांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात या शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने समायोजन प्रक्रिया राबविली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ६० अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने होणार समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 5:45 PM