००००००
मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण
वाशिम : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना जोड व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहे. कृषी तंत्र अधिकारी सत्यभान मकासरे यांनी मंगळवारी मार्गदर्शन केले.
00
वाशिम-केकतउमरा रस्त्याची दुर्दशा
तोंडगाव : वाशिम येथून केकतउमरा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.
00
मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत
वाशिम : मध्यंतरी कोरोना संकटातून दिलासा मिळाल्यानंतर लग्नकार्य व इतर कार्यक्रम व्हायला लागले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून मर्यादित उपस्थितीचे बंधन लागू करण्यात आल्याने मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत सापडले आहेत.
00
शौचालय वापराकडे दुर्लक्ष
वाशिम : जऊळका रेल्वे गाव परिसर सदोदित स्वच्छ राहावा, यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनेकांना शौचालय उभारून देण्यात आले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर घाण करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
00
५० लोकांची कोरोना चाचणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथील १८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, बाधितांच्या संपर्कातील ३५ व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
00
फिरत्या व्हॅनमधून जनजागृती
वाशिम : जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. यासाठी गावागावात फिरत्या व्हॅनने जनजागृती केली जात आहे. कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.
पोलिसांची वाहनचालकांवर कारवाई
वाशिम : नियमांचे उल्लंघन, मास्कचा वापर न करणाऱ्या ४२ वाहनचालकांवर शिरपूर पोलिसांनी गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली.
00
रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी
वाशिम : गत चार वर्षांपासून रेतीघाटाचे लिलाव बंद असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. रेतीघाटाचे लिलाव करण्याची मागणी मिलिंद गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.
00
निवाऱ्याचा प्रवाशांचा आधार
वाशिम : वाशिम ते शेलूबाजार हा नव्याने रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर पूर्वी असलेले प्रवासी निवारे तोडून नव्याने प्रवासी निवारे उभे करण्यात आल्याने प्रवाशांना सोयीचे झाले आहे.
00
आरोग्य विभागातर्फे जागृती मोहीम
वाशिम : मालेगाव तालुक्यातील धमधमी येथे पुन्हा पाच कोरोनाबाधित आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागातर्फे बुधवारी धमधमी परिसरात जनजागृती करीत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.