वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन अदा करावे, अशा सूचना जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सोमवारी दिल्या.
ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राम प्रशासन आणि पंचायत प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामपंचायत कर वसुलीसह जन्म-मृत्यु नोंदी घेणे, दिवाबत्ती, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत स्वच्छता, स्वच्छ भारत अभियानासह विविध कामे पार पाडावी लागतात. या कर्मचाºयांना पाच हजारापासून ते साडेसात हजारापर्यंत वेतन मिळते. त्यापैकी ५० टक्के वेतन जिल्हा परिषदेक डून आणि ५० टक्के वेतन हे संबंधित ग्राम पंचायतकडून मिळते. वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, अनेक ग्रामपंचायत कर्मचाºयांना ग्राम पंचायकडून ५० टक्के वेतन मिळालेले नाही. मालेगाव तालुक्यातील १२५ च्या वर ग्राम पंचायत कर्मचारी गत काही महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशीच स्थिती अन्य तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांची आहे. या पृष्ठभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी गटविकास अधिकाºयांना सूचना देत ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. ग्रामसेवक, ग्रामसचिवांनी ग्रामपंचायत कर्मचाºयांची दिवाळी गोड व्हावी यासाठी वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशा सूचना माने यांनी दिल्या.