उन्हाळा सुरु होण्याचे प्रारंभीच गावकऱ्यांना पाणीटंचाईचे चटके बसायला लागले होते . पाणी समस्येने गावकऱ्यात वैताग होता . गावचे माजी ग्रा.पं. सदस्य नितीन पा. उपाध्ये यांनी गावकऱ्यांची पाणी समस्या प्रशासक देशमुख व जि .प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे यांना अवगत केली . तात्पुरती व्यवस्था केल्यापेक्षा कायमस्वरूपी पाणी समस्या निकाली काढावी असे त्यांनी सुचविले . प्रहार जनशक्ती संघटनेच्या
सेवकांनी गावच्या नादुरुस्त विंधन विहिरी प्रशासकांना दाखविल्या, त्यानुसार नादुरुस्त विंधन विहिरी दुरुस्त करणे त्याची देखभाल व विंधन विहिरीचा परिसराची स्वच्छता याबाबत प्रशासकाचे व जि.प . सदस्य अशोकराव डोंगरदिवे यांचे लक्ष वेधले . त्यानुसार गावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी तातडीने सोडविण्याचे दृष्टीने लवकरच कृती आराखडा तयार करून कार्यवाही करणार असल्याचे ग्रामपंचायतचे प्रशासक देशमुख व जि.प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे यांनी सांगितले . या सभेला गावचे ग्रा .पं. चे आजी माजी पदाधिकारी संस्थानचे पदाधिकारी
प्रहार जनशक्ती संघटनेचे सेवक , राजे ग्रुपचे सदस्य ,पो. पाटील, पं. स. सदस्य, समाजसेवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .