लोकमत न्युज नेटवर्कशिरपूर: मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथून जवळच असलेल्या खंडाळा येथील अडोळ प्रकल्पाचे गेट नादुरुस्त आहे. त्यामुळे या प्रकल्पातून दरदिवशी अकारणच लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे.मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने जवळपास १८ प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे शेतकºयांना रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांसह फळ पिके घेणे शक्य झाले. त्यात शिरपूर येथून काही अंतरावरच असलेल्या खंडाळा येथेही अडोळ प्रकल्पाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. या प्रकल्पातून मालेगाव शहराला पाणी पुरवठा होतो, तसेच शेकडो हेक्टर शेतीवर सिंचनही केले जाते. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा वाचविणे अत्यावश्यक आहे; परंतु मागील काही वर्षांपासून या प्रकल्पाचे गेट नादुरुस्त झाले आहेत.त्यामुळे हा प्रकल्प काठोकाठ भरूनही शेतकºयांना त्याचा म्हणावा तेवढा फायदा होत नाही. नादुरुस्त गेटमधून सतत पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्याच्या पूर्वीच या प्रकल्पाची पातळी तळ गाठू लागते. गतवर्षीही आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आलेल्या पावसामुळे या प्रकल्पात बºयापैकी साठा वाढूनही नादुरुस्त गेटमुळे पाण्याचा अपव्यय झाल्याने त्याचा म्हणावा तेवढा फायदा शेतकºयांना होऊ शकला नाही. असे असतानाही प्रकल्पाच्या गेटची दुरुस्ती पाटबंधारे विभागाने केली नाही. त्यामुळे आता यंदाच्या पावसाळ्यात दमदार पावसामुळे या प्रकल्पाची पातळी वाढल्यानंतर नादुरुस्त गेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. मागील दोन वर्षांपासून अडोळ प्रकल्पाचे गेट नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात या गेटधमधून सतत पाणी वाहून जाते. लघू सिंचन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आम्हाला सिंचनात अडचणी येत आहेत. लघू सिंचन विभागाने या प्रकल्पाचे गेट दुरुस्त केल्यास शेतकºयांना फायदा होईल.-विक्रम शिंदेखंडाळा, ता.मालेगाव