ठळक मुद्देउत्पादन वाढण्याची शक्यताशेतक-यांकडून डवरणीचे फेर
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सतत चार दिवस आलेल्या परतीच्या पावसामुळे तूर आणि कपाशीच्या पिकाला मोठा आधार मिळाला असून, आता या पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर तुरीची, तर ३० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. तथापि, यंदा सप्टेंबरपर्यंतही अपेक्षीत पाऊस न पडल्यामुळे हे पिके सुकण्याच्या मार्गावर आली होती. पावसाचा पत्ताच नसल्याने अनेक शेतक-यांनी, तर तुषार सिंचनाचा आधार घेऊन पीक वाचविण्याचे प्रयत्नही केले. तथापि, केव्ळ कोरडवाहू शेती असलेल्या शेतक-यांच्या चेहºयावर पावसाअभावी सुकत चाललेले पीक पाहून चिंतेचे भाव निर्माण झाले होते. या पिकांसाठी पुढे खर्च करण्याचीही इच्छा त्यामुळे शेतक-यांना राहिली नव्हती; परंतु गत आठवड्यात परतीच्या पावसाने या शेतक-यांवर कृपादृष्टी टाकताना चार दिवस जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे या पिकांना मोठाच आधार झाला असून, सुकत चाललेली ही पिके आता पुन्हा हिरवीगार होऊन डोलत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी कपाशी आणि तुरीला फुलधारणाही होत असून, या दोन्ही पिकांच्या उत्पादनात थोडी वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांनी आता या पिकांत डवरणीचे फेर सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.