जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. त्यानुसार, वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीचा सुधारित आदेश जारी केला. आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बाजारपेठ बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणी विनाकारण फिरताना आढळल्यास संबंधितांना प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शनिवारी रात्री उशिरा शहरात विनाकारण काेणी फिरत आहे का, याची पाहणी ‘लाेकमत’च्या वतीने करण्यात आली. यावेळी शहरातील पुसद नाका, आंबेडकर चाैक, पाटणी चाैक, शिवाजी चाैक, रिसाेड नाका, अकाेला नाका, बस स्थानक चाैक, मन्नासिंह चाैक, पाेस्ट आफिस चाैक, हिंगाेली नाका चाैकांची पाहणी करण्यात आली. यामध्ये पुसद नाका या महत्त्वाच्या चाैकासह मन्नासिंह चाैक व हिंगाेली नाका परिसरात पाेलीस आढळून आले नाहीत. ज्या चाैकामध्ये पाेलीस हाेते, त्या ठिकाणी रात्री फिरणाऱ्या नागरिकांकडून विचारपूस करण्यात आली. रात्री ११ नंतर पाेलीस अधिकारी कर्मचारी गस्तीवरही दिसून आलेत.
....................
पुसद नाक्यावरील चहा कॅन्टीन सुरूच
शनिवारी रात्री संचारबंदीतही पुसद नाका येथे चहाचे कॅन्टीन छुप्प्या पद्धतीने उघडे दिसून आले. या कॅन्टीनच्या बाजूला अनेक नागरिक दिसून आलेत. येथे एकही पाेलीस कर्मचारी आढळून आला नाही.
पाेलीस निरीक्षक उदय साेईस्कर शहरात फिरतांना आढळून आलेत. त्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना थांबवून चांगलेच धारेवर धरले.
वाशिम शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर काेड बसविण्यात आले असल्याने पाेलिसांची गस्त शहरात दिसून आली. शहरातील मुख्य रस्त्यासह मुख्य स्थळांना भेटी देत असल्याचे पथकातील कर्मचारी दिसून आले.
.................
काेराेना नियमांचे पालन नागरिकांनी करावे, जे करीत नाहीत, त्यांच्यासाठी पाेलीस कडक नियम राबवित आहेत. संचारबंदी काळात शहरातील प्रत्येक प्रमुख चाैकामध्ये पाेलिसांना नेमले आहे. मी स्वत: फिरून याची पाहणी करीत असताे. कर्मचारी व्यवस्थित कर्तव्य बजावत आहेत.
- वसंत परदेसी,
पाेलीस अधीक्षक, वाशिम
..............
फाेटाे ओळी....
पुसद नाका येथे एकही कर्मचारी आढळून आला नाही. यावेळी येथे असलेल्या ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी गर्दी दिसून आली. छुप्या पद्धतीने एक कॅन्टीनही सुरू हाेते. पुसद नाका येथे एकही कर्मचारी आढळून आला नाही. यावेळी येथे असलेल्या ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी गर्दी दिसून आली. छुप्या पद्धतीने एक कॅन्टीनही सुरू हाेते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैकामध्ये दाेन पाेलीस कर्मचारी कर्तव्यावर दिसून आले. काही काम नसताना फिरणाऱ्यांना यावेळी या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैकामध्ये दाेन पाेलीस कर्मचारी कर्तव्यावर दिसून आले. काही काम नसताना फिरणाऱ्यांना यावेळी या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली.
वाशिम-अकाेला रस्त्यावरील अकाेला नाका परिसरात दाेन पाेलीस कर्मचारी कर्तव्यावर दिसून आले. यावेळी गस्तवर असलेले अधिकारी उदय साेईस्करही हाेते. वाशिम-अकाेला रस्त्यावरील अकाेला नाका परिसरात दाेन पाेलीस कर्मचारी कर्तव्यावर दिसून आले. यावेळी गस्तवर असलेले अधिकारी उदय साेईस्करही हाेते.
शिवाजी चाैकात मंगेश मालवे पाेलीस कर्मचारी कर्तव्यावर हाेते. यावेळी गस्तीवर असलेले दाेन पाेलीस कर्मचारीही तेथे आले हाेते. शिवाजी चाैकात मंगेश मालवे पाेलीस कर्मचारी कर्तव्यावर हाेते. यावेळी गस्तीवर असलेले दाेन पाेलीस कर्मचारीही तेथे आले हाेते.