लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम): बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटना पुणे यांच्यावतीने २८ फेब्रुवारीपासून बेमुदत कामकाज बंद व धरणे आंदोलन पुकारण्यात आल होते. याची दखल घेऊन १ मार्च रोजी राज्य सरकारने मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समितीसह राज्यभरातील इतरही बाजार समित्यांचे व्यवहार १ मार्चपासून पूर्ववत सुरु झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटना पुणे यांच्या तीने २८ फेब्रुवारी पासून राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांचे कायम कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.त्यामुळे संपूर्ण राज्यासह मंगरुळपिर बाजार समितीचे कामकाज बंद होते; परंतु २८ फेब्रुवारीला धरणे आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ सहकार व पणनमंत्री सुभाषराव देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाºयांना आचार संहिता संपताच त्यांच्या मागण्याची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री यांच्या वतीने दिले व सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे २८ फेब्रुवारी रोजीच सायंकाळी बाजार समिती कर्मचाºयांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले आणि १ मार्च पासून राज्यातील बाजार समित्यासह मंगरूपीर येथील बाजार समितीचे मार्केट पूर्ववत सुरू झाले. या धरणे आंदोलनात मंगरुळपीर बाजार समितीचे सचिव रामकृष्ण पाटील वक्टे, सांख्यिकीचे प्रभाकर देशमुख, लेखापाल गणेश शर्मा, प्रकाश राऊत, लिपिक मधुकर ठाकरे, नरेश भोयर, दिलीप मांढरे यांचेसह कर्मचाºयांनी मुंबई येथील आझाद मैदानावर झालेल्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता.
शासनाच्या आश्वासनानंतर बाजार समिती कर्मचाऱ्यांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 2:55 PM