लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील सर्वात गजबजलेला व रहदारीचा चौक म्हणजे पाटणी चौक. या चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजी विक्रेते व काही व्यापाºयांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतिने २३ आॅगस्ट रोजी थातूर-मातूर राबविण्यात आली. कारवाईनंतर काही वेळातच परिस्थिती जैसे थे झाल्याने या कारवाईला काही अर्थ उरला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.मंगरुळपीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे यांनी कार्यभार स्विकारल्याबरोबर मंगरुळपीर येथील वाहतूक व्यवस्थेला वठणीवर आणण्याचे कार्य केले. वाशिम येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष त्यांची उपस्थिती होती. त्यांनी काही वेळातच रस्ता मोकळाही केला, परंतु वाशिमात कायदयाचा धाकच राहला नसल्याचा प्रत्यय कारवाईनंतर थोडयाच वेळात दिसून आला. कारवाई झाल्याबरोबर काही वेळातच रस्त्यावर पुन्हा मोठया प्रमाणात फेरीवाले, भाजीवाले पुन्हा येवून बसलेत. तसेच रस्त्यावर नागरिकांनीही वाहने उभी करुन मोकळे झालेत. पाटणी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियमित कारवाई मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.
एक दिवसाची कारवाईवाशिम शहरातील सर्वात गजबजलेल्या रस्त्यावर लघुव्यावसायिकांसह , व्यापाºयांनी केलेले अतिक्रमणावर शहर वाहतूक शाखेच्यावतिने कारवाई २३ आॅगस्ट रोजी या एका दिवशी करण्यात आली. कारवाईनंतर काही वेळातच परिस्थिती जैसे थे झाल्याने या कारवाईचा काय फायदा अशी प्रतिक्रीया नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.