शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

दोन वर्षांनंतर मिळाली तुरीची नुकसानभरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:25 AM

वाशिम: तूर उत्पादक शेतकर्‍यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.

ठळक मुद्देतीनच तालुक्यांचा समावेश हेक्टरी ४७८८ रुपये बँक खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तूर उत्पादक शेतकर्‍यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.२0१४-१५ आणि २0१५-१६ या दोन वर्षांंत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्यामुळे तूर पिकाला जबर फटका बसला होता. त्यानुसार, नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळण्यास शेतकर्‍यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. सध्या ही रक्कम शासनाकडून मंजूर होऊन संबंधित पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, भटउमरा, माळेगाव, सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, बिटोडा तेली, काजळंबा, खरोळा, जांभरूण महाली, ब्राह्मणवाडा, गोंडेगाव, आसोला जहाँगीर, साखरा, फुलसाखरा, काकडदाती, कोंडाळा झामरे, सुराळा, काटा, तोरनाळा, सोयता, भोयता, कळंबा महाली, किनखेडा, चिखली, धानोरा, सुपखेला, तांदळी शेवई, दुधखेडा, पार्डी आसरा, देगाव, ब्रह्म, कानडी, शेलगाव, बाभूळगाव, बोरी, मसला, फाळेगाव, जांभरूण जहाँगीर या गावांमधील नुकसानभरपाईस पात्र ४२00 शेतकर्‍यांना प्रती हेक्टर ४७८८ रुपये याप्रमाणे १ कोटी १६ लाख रुपये मंजूर होऊन, सदर रक्कम त्या-त्या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित कारंजा, मानोरा या तालुक्यांमधीलही आठ हजारांच्या आसपास शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मंजूर होऊन सदर रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आर्थिक अडचणीतील शेतकर्‍यांना ‘आधार’!शेतमालाला अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्याने शेतकर्‍यांची परवड सुरू असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनपाठोपाठ तुरीच्या दरातही झालेली विक्रमी घसरण आणि चालू हंगामात पावसाअभावी संकटात सापडलेली पीक परिस्थिती. अशा बिकटप्रसंगी शासनाकडून २0१४-१५ आणि २0१५-१६ मधील तुरीची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांची सोय झाली आहे.