लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी कर्मवीर दादा ईदाते आयोग लागू करावा या मागणीसाठी भटक्या विमुक्त विविध संघटनांच्यावतिने ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी कर्मवीर दादा ईदाते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय इदाते आयोग लागू करण्यासाठी वंजारी सेवा संघ, विमुक्त जनजाती विकास परिषद विदर्भ विभाग यांच्यासह विविध संघटनेच्यावतीने भटक्या विमुक्त, घुमन्तु, अर्धघुमन्तु जाती ,जमातीच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.सरकारने याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या वेळीच मान्य केल्या नाही तर यापुढे उग्र आंदोल करू असा इशारा संघटनेचे सदस्य सुनील कायंदे यांनी यावेळी दिला. यावेळी वंजारी सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष सुनिल कायंदे यांच्यासह विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद विदर्भ विभाग वंजारी सेवा संघ, वाशिम जय मल्हार संघटना, वाशिम वडार समाज संघटना,भोई समाज संघटना, श्रीराम वाल्मिक सेना, कोळी संघटना, गोर सेना बंजारा सेवा संघ वाशिमचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
भटक्या विमुक्त संघटनांच्यावतिने धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 2:53 PM