वाशिम : विद्यमान भाजपा सरकारने आपल्या वचननाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते. मात्र त्याची पूर्तता गेल्या साडेचार वर्षांत झालेली नाही. त्यामुळे आता संयमाचा बांध फुटला असून आगामी जानेवारी महिन्यात या मुद्द्यावर वाशिममध्ये मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय समाजबांधवांनी गुरुवार, २७ डिसेंबर रोजी येथे झालेल्या बैठकीत घेतला.स्थानिक विश्रामगृहात झालेल्या बैठकीस नगरसेवक बाळू मुरकुटे, आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेव लांभाडे, मल्हार सेनेचे अध्यक्ष नारायण बोबडे, रवी लांभाडे, डिगंबर खोरणे, डॉ. परमेश्वर खराट, डॉ. ज्ञानेश्वर डाळ, गजानन जटाळे, नागेश गावंडे, लाला खोडवे, संतोष पातळे, विनोद मेरकर, विरेंद्र चारवळ, महादेवराव बोरकर, सुनील मुखमाले, योगेश नप्ते, शुभम मस्के, ज्ञानेश्वर टोंचर, शंकर पातळे, संतोष काळदाते, गजानन लांडे, प्रल्हाद खोरणे, रुपेश लांडे, विशाल वारेकर, ज्ञानेश्वर जारे, किसन टोंचर, शंकर पातळे, सुभाष फुके, किसनराव खोडके, गोविंदा डहाळके, गणेश डाळ, आकाश गोरे आदिंची उपस्थिती होती.सर्वसामान्य धनगर समाजबांधवांना आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. यामुळे संपूर्ण राज्यातील समाजबांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे किसनराव मस्के यांनी सांगितले. या आंदोलनात समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन महादेव लांभाडे यांनी केले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर जानेवारीत वाशिममध्ये आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 5:29 PM