लोकमत न्यूज नेटवर्कबोराळा जहाँ (वाशिम) : बोराळा आणि परिसरातील खंडाळा, वाघी, ढोरखेडा, शेलगाव यासह इतर गावातील शेतक-यांनी अडोळ लघूप्रकल्पावरील खंडीत विद्युत पुरवठा पुर्ववत जोडून मिळणेबाबत गुरूवारी जिल्हाधिका-यांची भेट घेवून चर्चा केली. बोराळा येथील अडोळ लघूप्रकल्पातून मिळणा-या पाण्याच्या आधारे परिसरातील शेतकरी हळद, हरभरा, तुर आदी पिके घेतात. यंदा मात्र जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार महावितरणने अडोळ लघूप्रकल्पांतर्गत येणा-या शेतक-यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा ख्ांडीत केला आहे. त्यामुळे विजेअभावी शेतातील उभी पिके सुकत आहेत. ही बाब लक्षात घेवून कृषीपंपांचा खंडीत केलेला विद्युत पुरवठा पुर्ववत करण्याबाबत महावितरणला आदेश द्यावे आणि नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संबंधित शेतकºयांनी यावेळी केली.
कृषीपंपांना विद्युत जोडणीसाठी शेतक-यांची प्रशासनाकडे धाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 7:18 PM
बोराळा जहाँ (वाशिम) : बोराळा आणि परिसरातील खंडाळा, वाघी, ढोरखेडा, शेलगाव यासह इतर गावातील शेतक-यांनी अडोळ लघूप्रकल्पावरील खंडीत विद्युत पुरवठा पुर्ववत जोडून मिळणेबाबत गुरूवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून चर्चा केली.
ठळक मुद्देनुकसान भरपाईची मागणीपाण्याअभावी सुकताहेत पिके